सेवानिवृत्त सैनिक नवशाद पटेल यांचा यावल वकील संघाकडून सन्मान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोरपावली या गावातील रहिवासी नवशाद पटेल यांनी सैन दलात २० वर्ष मातृभुमीची रक्षा केली व ते नुकतेच सेवा निवृत्त झाले. तेव्हा त्यांच्या सेवा निवृत्तीनंतर कोरपावली गावात शुक्रवारी एका छोटे खानी कार्यक्रमात यावल येथील वकील संघाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरपावली ता.यावल येथील रहिवासी तथा देशाच्या सिमेवर सैनिक म्हणुन २० वर्ष सेवा बजावून नवशाद पटेल हे सेवा निवृत्त झाले. व ते गावी परतले आहे. पटेल हे यावल तालुका वकील संघाचे सदस्य ॲड.रियाज पटेल यांचे मोठे बंधू आहे.

भारतीय सैनिक मेजर नवशाद पटेल यांचा भारतीय मातृभूमी साठी २० वर्षे सैनिकी सेवा बजावून सेवा निवृत्ती झाल्या बद्दल यावल तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.नितीन चौधरी, वकील संघ सचिव ॲड.आकाश चौधरी सह सर्व वकील संघाचे सदस्य यांनी शुक्रवारी सन्मान केला व त्यांना पुढील आयुष्या करीता शुभेच्छा दिल्या या प्रसंगी न्यायालयातील सरकारी वकील व त्यांचे केस वॉच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content