कपाटात उतरला विद्यूत प्रवाह; दोन महिला जखमी

Electric Shock Danger DC Photo 0 0 1 0

जळगाव प्रतिनिधी । गावाला जाण्यासाठी लोखंडी कपाटातून कपडे काढतांना कपाटात उतरलेल्या विजेच्या धक्क्याने सख्ख्या दिरानी जेठानी जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली असून दोघांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायराबी अबिद अली (वय-25) आणि इरफानबी अशफाक अली (वय-25) दोन्ही रा. गेंदालाल मिल ह्या दिरानी आणि जेठाणी घरात एकत्र राहतात. दिरानी सायराबी यांचे माहेर अडावद असल्याने काही कारणामुळे त्यांचा भावाचा मृत्यू झाला होता. त्यासाठी गावी जाण्यासाठी आज सकाळी 8 वाजता तयारी करत असतांना लोखंडी कपाटातून कपडे काढत असतांना त्यांना कापाटात विज उतरल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. दिरानीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांना वाचविण्याकरीता जेठाणी इरफानबी या धावून आल्या, त्यांना देखील यावेळी विजेचा जोराचा झटका बसला. दोन्ही जमीनीवर पडल्या. यावेळी अबिद अली यांच्या लक्षात असल्यानंतर घरातील विज प्रवाह तातडीने बंद केला.

इलेक्ट्रीक फिटींगची पट्टीतून वायर बाहेर आली होती. ती वायर लोखंडी कपाटावर होती. त्यामुळे हा प्रकार घडला. घरात एकत्रीत कुटुंबिय असल्याने दहा वर्षाच्या आतील चार लहान मुले आहे. दरम्यान जेव्हा दोघांना विजेचा धक्का बसला त्यावेळी दोन लहान मुले त्यांच्या पाठीसी होते. सुदैवाने दोन्ही मुले बचावली. जखमी झालेल्यांना तातडीन जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Add Comment

Protected Content