मतमोजणीच्या माहितीसाठी 1950 टोल फ्री क्रमांकावर सुविधा उपलब्ध


जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील 03-जळगाव व 04-रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवार, दिनांक 23 मे, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा गोदाम क्रमांक 16 व 17, एमआयडीसी एरिया, जळगाव येथे होणार आहे.

मतमोजणी बाबतची माहिती तसेच तक्रारीसाठी 1950 या टोल फ्री क्रमाकांवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी याबाबत नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Add Comment

Protected Content