Home राजकीय भाजपवर नव्हे फडणविसांसह कंपूवर नाराज- खडसे

भाजपवर नव्हे फडणविसांसह कंपूवर नाराज- खडसे

0
115

eknath khadse

नेवासा । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपण पक्षावर नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांवर नाराज असल्याचा पुनरूच्चार केला आहे. शनि-शिंगणापूर येथे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे बंडाचे सूर गत आठवड्यात थोडे मावळल्याचे दिसून येत आहेत. विशेष करून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना स्थान मिळाल्याने त्यांची नाराजी बर्‍याच प्रमाणात दुर झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, ते शनिवारी शनि-शिंगणापूर देवस्थानावर दर्शनासाठी आले होते. यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, आपण भाजपवर नाराज नसून पक्षातील फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार आहे. मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षांपासून पक्षाकडून नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणाजया गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत परळी येथील सभेत काही मुद्दे सांगितले. याविषयी योग्य वेळी अधिक सविस्तर बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


Protected Content

Play sound