एकनाथराव खडसे यांना ‘उर्दू दोस्त’ पुरस्कार

सावदा प्रतिनिधी । येथील हाजी इक्बाल शेख हुसेन फाउंडेशनतर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ‘उर्दू दोस्त’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

डायमंड इंग्लिश स्कूलच्या सभागृहात मुशायरा आयोजित करण्यात आला. यात एकनाथाव खडसे यांच्या हस्ते हाजी शेख इक्बाल शेख हुसेन हॉलचे उदघाटन करण्यात आले. खडसेंना डायमंड इंग्लिश स्कूलतर्फे ‘उर्दू दोस्त’ तर माजी प्राचार्य सलीम खान यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. सय्यद अजगर सय्यद तुकडू, शेख सुपडू शेख रशीद मंसुरी, एपीआय राहुल वाघ यांचाही गौरव झाला. याप्रसंगी डायमंड ट्रान्सपोर्टचे संचालक हाजी अजमल शेख इक्बाल, रज्जू शेख इक्बाल, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, अफसर खान, जीवन महाजन, रफिक शेख, नगरसेवक अल्लाहबक्ष शेख नजीर, फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नाजीम, शेख कुतुबुद्दीन उपस्थित होते. सूत्रसंचालन साबीर शेख यांनी केले.

Protected Content