भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ विभागातून धावणाऱ्या आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे. झांशी रेल्वे जंक्शन रेल्वे स्थानकावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
भुसावळ विभागातील आठ गाड्या रद्द झाल्याने ऐनवेळी जाहीर झालेल्या ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. प्रवाशांनी नियोजित प्रवासासाठी महिनाभर आधी आरक्षण केल्यानंतर आता अचानक रेल्वेने ब्लॉक जाहीर केल्यानंतर प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरांगणा लक्ष्मीबाई झाशी जंक्शन रेल्वे स्टेशनवर ३५ दिवसांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ०४ (६०० मीटर लांबी) चा धुण्यायोग्य अॅप्रनच्या दुरुस्तीच्या कामासाठी उत्तर मध्यरेल्वेच्या विभागाला रेल्वे बोर्डाने ब्लॉक घेण्यास मंजुरी दिली आहे मात्र यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
रद्द झालेल्या गाड्या व कंसात रद्द तारीख
रद्द गाड्यांमध्ये 01921 पुणे-विरांगणा लक्ष्मीबाई झाशी जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस (14, 21 व 28 सप्टेंबर), 01922 विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन -पुणे साप्ताहिक एक्सप्रेस (13, 20 व 27 सप्टेंबर), 12171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस (11, 24, 9, 21, 25 व 28 सप्टेंबर), 12172 हरिद्वार जंक्शन-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन (12, 15, 19, 22 व 26 सप्टेंबर), 22456 कालका-साईनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस (14, 17, 21, 24 व 28 सप्टेंबर), 22455 साईनगर शिर्डी-कालका द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस (16, 19, 23, 26 व 30 सप्टेंबर), 12406 हजरत निजामुद्दीन-भुसावळ जंक्शन गोंडवाना एक्सप्रेस (15, 17, 22, 24 व 29 सप्टेंबर), 12405 भुसावळ जंक्शन-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस (17, 23, 24, 26 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर)