Home Cities भुसावळ कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला पालकमंत्र्यांकडून ‘सेंड ऑफ’ !

कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला पालकमंत्र्यांकडून ‘सेंड ऑफ’ !

0
105


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकतेच बदली झालेले भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची बदली झाली असून ते संगमनेर येथे रूजू होणार आहेत. आज ते आपल्या पदाचा कार्यभार सोडत आहेत. तसेच भुसावळात आज त्यांचा नागरी सत्कार करून निरोप देण्यात येत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वाघचौरे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सोमनाथ वाघचौरे यांची कारकिर्द ही भुसावळकरांच्या कायम स्मरणात राहणारी आहे. यामुळे कधी काळी क्राईम कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. याच कामाची पावती म्हणून स्वत: पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा करून सेंड ऑफ दिल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.


Protected Content

Play sound