गोळीबार प्रकरणात आठ जण पोलीसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क परिसरात पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी परस्पर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात पोलीसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली.

 

पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

जळगाव शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क येथे शुभम अशोक माने हा आपला भाऊ मयूर माने आणि परिवारासह वास्तव्याला आहे. खंडणीची मागणी आणि पैशांवरून मयूर माने यांचे काही चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे याचे साथीदार असलेले तरूणांशी वाद सुरू होता. यापुर्वी तरूणांनी चिंग्याला जेलमधून सोडण्यासाठी पैशांची मागणी करत  शिवीगाळ व धमकी दिली होती. त्यामुळे घाबरून शुभमने वेळोवळी फोन-पे ने पैसे दिले होते. अजून पुन्हा पैशांची मागणी करण्यासाठी गुरूवारी २७ जुलै रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मयूर माने हा आपल्या परिवारासह घरी असतांना सात ते आठ तरूणांनी घरासमोर येवून शिवीगाळ व दगडफेक केली. त्यामुळे माने कुटुंबिय घराचा दरवाजा बंद करून घरात गेले. त्यावेळी घराच्या खाली उभे असलेल्या तरूणांनी घरावर दगडफेक केली. त्यानंतर गोळीबार केला. त्यानंतर पसार झाले.

 

दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की,

शहरातील संत मिराबाई नगरात चेतन रमेश सुशीर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चेतनची गेल्या काही वर्षापासून शुभम माने याची ओळख आहे. सात महिन्यांपुर्वी शुभम माने याने चेतन कडे उसनवारीने पैसे मागितले होते. जास्त पैसे मिळतील या उद्देशाने चेतन सुशीर आणि उमाकांत दत्तात्रय धोबी यांनी मिळून ८०हजार रूपये दिले. त्यानंतर चेतन आणि उमाकांत यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली असता शुभम माने हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे चेतन सुशीर हा त्याचे मित्र लखन मराठे, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे, समीर सोनार, बंटी बांदल यांना सोबत घेवून गुरूवारी २७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शुभच्या घरी आले. त्यावेळी पैसांची मागणी केली असता शुभमने शिवीगाळ केली. त्यानंतर आलेल्या तरूणांवर दोन वेळा गोळीबार केला. त्यानंतर सर्वजण जीव वाचवून पळत सुटले.

 

परिसरात दहशत

गुरूवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. सुरूवातीला नेमके काय झाले हे स्थानिक नागरीकांना समजले नाही. गोळीबार झाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे पीआय किसन नजन पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 

शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

गोळीबार प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यात पहिल्या फिर्यादीनुसार लखन ऊर्फ गोलू दिलीप मराठे रा. शिवाजी नगर, लक्ष्मण शिंदे रा. शिवाजी नगर, नरेश शिंदे रा. शिवाजी नगर, उमकांत दत्तात्रय धोबी रा. संत मिराबाई नगर, जळगाव, समीर शरद सोनार रा. फारेस्ट कॉलनी जळगाव, राजेश उर्फ बंटी सदाशिव बांदली रा. उस्मानिया पार्क, जळगाव, चेतन रमेश सुशीर रा. मिराबाई नगर, जळगाव, चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या रा. तुकाराम वाडी, जळगाव आणि महेश मराठे रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर दुसऱ्या फिर्यादीवरून शुभम अशोक माने आणि मयूर अशोक माने दोन्ही रा. कानळदा रोड, जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यांनी केली अटक

चेतन रमेश सुधीर, राजेश बांदल, उमाकांत धोबी, समिर सोनार, लक्ष्मण शिंदे, लखन शिंदे, मयूर माने, शुभम माने या आठ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Protected Content