वरणगाव दत्तात्रय गुरव | येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा बस स्टॅन्ड चौकामध्ये आज कार्यकर्त्यांनी पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले होते, या अप शब्दाचा निषेध करण्यासाठी आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते एकत्र येऊन वरणगावच्या बस स्थानक चौकामध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत अब्दुल सत्तार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला आहे