सातगाव (डोंगरी) येथील अल्पवयीन मुलाने संपवली जीवनयात्रा

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील ऋषिकेश संतोष आवारे याने दि. ६ रोजी संध्याकाळी शेतामध्ये जाऊन गळफास घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  रविवार दि. ६ नोव्हेंबर रोजी ऋषीकेश संतोष आवारे याचे आई- वडील आणि मोठा भाऊ कापूस वेचणीच्या कामानिमित्त दुसऱ्याच्या शेतावर गेलेले होते. ऋषीकेश हा निम्म्या वाट्याने केलेल्या दुसऱ्याच्या शेतावर शेळ्या आणि बैल चारण्यासाठी गेलेला होता. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेळ्या घरी आणून बांधून ठेवल्या. नंतर शेतात कोणालाच न सांगता निघून गेला. सात वाजेच्या दरम्यान वडिलांनी गावात व गावातीलच असलेल्या मुलाच्या मामाकडे तपास केला असता तो आढळून आला नाही. वडील संतोष लक्ष्‍मण आवारे व भाऊ अनिकेत हे दोघे शेतात ऋषीकेशचा शोध घेण्यासाठी गेले. यावेळी  त्यांना ऋषीकेश हा झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी वडिलांनी व  भावाने हंबरडा फोडला. पोलीस पाटील दत्तू पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात दूरध्वनी वरून खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र ऋषीकेशच्या वडिलांनी त्याचे मृत्यू बद्दल संशय व्यक्त केला आहे.  दरम्यान, ऋषीकेशचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सोमवार  दि. ७ रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ऋषीकेश वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल आर. के. पाटील हे करीत आहे.

 

Protected Content