Home Cities जळगाव जळगावातील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर बांधले शिवबंध

जळगावातील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर बांधले शिवबंध

0
32


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आज मातोश्रीवर राष्ट्रवादी  कॉंग्रेस, कॉंग्रेस व प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेत शिवबंधन बांधुन प्रवेश केला.

 

 

 

आज मातोश्रीवर जिल्ह्यातील आज राष्ट्रवादी  कॉंग्रेस, कॉंग्रेस व प्रहार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंध बांधून घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे या पक्षात प्रवेश दिला. यात युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस उमेश रावसाहेब पाटील , प्रवीण कौतिक पाटील, शेतकरी नेते छोटू सुकदेव पाटील, कोळी सेल कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष  भाऊसाहेब सुकदेव सोनवणे, प्रहार जिल्हा नेते डॉ. जुबेर खान,  ग्राम पंचायत सदस्य चेतन पुंडलिक सोनवणे आदी उपस्थित होती.

 

याप्रसंगी यांची होती उपस्थिती

जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख, संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ ,  जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे  महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील,   उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, महानगर प्रमुख शरद तायडे जळगाव, अॅड.शरद माळी उपजिल्हा प्रमुख, राजेंद्र ठाकरे उपजिल्हा संघटक आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound