अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करता अनेक बसमार्ग बंद करून ग्रामीण भागावर मोठा अन्याय होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची ये-जा करण्यासाठी गर्दी होत आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी टाळण्यासाठी 300 विद्यार्थी व काही कामगारांच्या सह्यांचे निवेदन अमळनेर आगार प्रमुखांना नुकतेच देण्यात आले.
अमळनेर तालुक्यातून अमळनेर शहरात शिक्षणासाठी हायस्कूल व कॉलेज मिळून, जवळपास 70 टक्के विद्यार्थी, विद्यार्थिनी ये जा करतात. साहजिकच त्यांची ये_ जा ही शैक्षणिक सेवा सवलती देणाऱ्या, महामंडळाच्या लालपरीतूनच होते. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून, अमळनेर तालुक्यातून शहरात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची फारच तारांबळ होत आहे. कारण अमळनेर आगराच्या गाड्या वेळेवर येत नाहीत. व गाड्यांच्या काही फेऱ्या रद्द देखील केलेल्या आहेत. कारण महाराष्ट्र शासनाने फतवा काढून, गणेश उत्सवासाठी कोकण वासियांची सोय करणे कामी, अनेक आगारातील बसेस मुंबईच्या गल्लीबोळात उभ्या करून, कोकण वासियांची सोय केली आहे. कोकणवासीय दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात जातात. मात्र यावर्षी शासनाने त्यांच्यावर मेहरबानी म्हणून अनेक आगारातील बसेस मुंबईला मागवल्या आहेत. अमळनेर आगारातून 15 ते 20 बसेस कोकण वासिनसाठी गेल्याचे कळते.
परंतु हे करताना ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करता, बसेसच्या अनेक फेऱ्या बंद करून ग्रामीण भागावर मोठा अन्याय केलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची येण्या जाण्यासाठी तारांबळ होत आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या टाळण्यासाठी अमळनेर आगार प्रमुख यांना ३०० विद्यार्थ्यांचे व काही कार्यकर्त्यांचे सह्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, श्री संदीप राव घोरपडे, कृषी उत्पन्न बाजार समिती च्या मुख्य प्रशासक तिलोत्तम पाटील, महाराष्ट्र शासन नियोजन समिती सदस्य तसेच प्रदेश समन्वयक ग्रंथालय विभाग रिताताई बाविस्कर, काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचनाताई वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक बी.के. सूर्यवंशी,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष आशाताई चावऱ्या, काँग्रेस सेवादल अमळनेर अध्यक्ष, बन्सीलाल जी भागवत, युवक काँग्रेस अध्यक्ष इंजि. महेश पाटील,युवक शहराध्यक्ष कुणाल चौधरी, अल्पसंख्यांक अध्यक्ष ताऊ सिब तेली, कार्तिक चौधरी, उदय पाटील, ई.ई.कार्यकर्ते हजार होते. तसेच संदीप घोरपडे यांनी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बस पूर्ववत सुरू करणे कामी विनंती अर्ज करण्याचे सांगितले आहे. व आगारप्रमुखांनी ते सन्मानपूर्वक स्वीकारावे असेही निवेदनात म्हटले आहे.