ब्रेकींग : १६ मार्चपासून जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यामुळे आता १६ मार्चपासून संपूर्ण जिल्ह्यात रात्री दहा ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकार्‍यांनी दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आधी जळगाव शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली होती. यानंतर जळगाव शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. यानंतर अन्य काही तालुक्यांमध्येही जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आज नव्याने निर्देश जारी केले आहेत.

या नवीन निर्देशानुसार संपूर्ण जिल्हाभरात आता रात्री दहा ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १६ मार्चपासून लागू करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहे.

Protected Content