अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. बिबेक देबरॉय हे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरूही राहिले आहेत.

दिल्ली एम्सने सांगितले की, बिबेक देबरॉय यांचा मृत्यू आतड्याच्या समस्येमुळे झाला. भारत सरकारने बिबेक देबरॉय यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

देबरॉय हे 5 जून 2019 पर्यंत नीती आयोगाचे सदस्य होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली तसेच लेखही लिहिले आणि संपादित केले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Protected Content