बसच्या “त्या” अपघातातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला होता. यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बसचालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथील शेतकरी गोपाल केशव अहिरे 9वय-६७) हे गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आपल्या शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत असताना पारोळा धरणगाव रस्त्याला जांभोरे येथे पारोळा कडून येणारी नाशिक धरणगाव बस क्रमांक (एमएच २० बीएल ३३६३) बसने शेतकरी गोपाल केशव अहिरे हे रस्त्याच्या बाजूने बैलगाडी चालवत असताना मागून त्यांना जोरदार धडक दिली. यात बैलगाडीचा चूराळा होऊन बैलांचा ही जागीच मृत्यू झाला.

शेतकरी गोपाल अहिरे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना त्यांचे लहान भाऊ नाना अहिरे यांनी तात्काळ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय जळगाव येथे त्यांना रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला आणि कमरेला व पायांना जबर मार लागल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.बस चालक व वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल अहिरे यांचा व्यवसाय शेतीच होता. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंबीय हतबल झाले आहे.या कुटुंबीयाला संबंधित विभागाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलं सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे.

Protected Content