खा. रक्षाताई खडसे यांच्या स्वीय सहायकाची गाडी उलटली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार रक्षाताई खडसे यांच्या स्वीय सहायकाची गाडी महामार्गावरून उलटली असून यात सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खासदार रक्षाताई खडसे यांचे स्वीय सहायक पंकज भारंबे चारचाकी वाहनाला भुसावळजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर वांजोळा रोड फाट्याजवळ राजस्थान मार्बलच्या जवळ ही चारचाकी गाडी उलटली. या वाहनाच्या पाठोपाठ एकनाथराव खडसे यांची कार येत होती. त्यांनी तातडीने पंकज भारंबे यांना तेथून जळगावला नेले

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने जळगावात एकनाथराव खडसे यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी पंकज भारंबे यांची गाडी उलटून अपघात झाला असला तरी यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगितले.

Protected Content