धनाजी नाना महाविद्यालयात “हिंदी दिवस” साजरा

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात आज १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिनानिमित्त ‘हमारा हिंदी और हमारा हिंदुस्थान’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख वक्ते म्हणून डॉ.नाना गायकवाड उपस्थित होते.

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे अनेक पैलूंवर मार्गदर्शन करतांना व्यक्ति, समाज आणि संस्कृती याचा सर्वांगीण विकास करण्याचे खरे कार्य भाषा करत असते आणि त्या भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन शिक्षक करत असतात, त्यातच भारतीय ज्ञान परंपरेत हिंदीचे महत्त्व अद्वितीय आहे.

आज हिंदी जगात प्रथम क्रमांकाची भाषा आहे. या गोष्टीचा आपण सर्व भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे आणि स्वतः जबाबदारीने आपल्या भाषेत तंत्राज्ञान, साहित्य, शैक्षणिक उपकरण, निर्माण करण्याचे काम हिन्दी भाषेतच केले पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती मतेच्या व लोकसेवक स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्याअर्पण करून करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उप प्राचार्य डॉ. ए.आय.भंगाळे, उपस्थित होते. विभाग अध्यक्ष डॉ.कल्पना पाटील यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.राजेंद्र राजपूत, डॉ. विजय सोनजे, डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी ही आपल्या शैलीत विचार मांडले व विद्यार्थ्यांनी शेरो शायरी, कविता, सुभाषिते, गीत असे विविध कला प्रकार सादर केले. सूत्रसंचालन डॉ.सतीश पाटील यांनी व आभार डॉ.विजय सोनजे यांनी मानले. पराग राणे, सिध्दार्थ तायडे, शेखर महाजन, गुलाब वाघोदे यांनी सहकार्य केले.

Protected Content