मराठी प्रतिष्ठानमार्फत जिल्हांतील महिलांना ई-रिक्षा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मराठी प्रतिष्ठानमार्फत नवीन वर्षात ‘झीरो डाउन पेमेंट’द्वारे जळगाव शहरासह जिल्ह्यामधील शंभर महिलांना ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संबंधित ई-रिक्षांना परिवहन विभागाची मान्यता असून, चार प्रवासी आसनक्षमता आहे. ई-रिक्षाला प्रवासी वाहतुकीचे परमीट आवश्यक नाही. रिक्षामीटर व लायसन्स मात्र गरजेचे आहे. शासकीय दरामध्ये लायसन्ससुद्धा उपलब्ध करून दिले जाणार असून, त्याकरिता परिवहन विभागाचे सहकार्य असणार आहे.

तसेच ई-रिक्षा चालविण्याचे सात दिवसांचे प्रशिक्षणसुद्धा मराठी प्रतिष्ठानतर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे. ई-रिक्षाकरिता राष्ट्रीयीकृत बँकांतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून, सर्व पाठपुरावा मराठी प्रतिष्ठान करणार आहे.

ज्या महिलांना ई-रिक्षा घ्यायची असेल त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्ससह मराठी प्रतिष्ठानच्या गणपतीनगर येथील कार्यालयात संपर्क साधावा. नावनोंदणी सुरू झाली असून, प्रथम शंभर आलेल्या महिलांनाच ई-रिक्षा देण्यात येईल, अशी माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी दिली.

Protected Content