सुरभीतर्फे नवरात्रानिमित्त श्रीसुक्त आवर्तन   

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सुरभी बहुुद्देशिय महिला मंडळ तर्फे गेल्या 10 ते 12 वर्षापासून मंडळातर्फे नवरात्रात श्रीसुक्त आवर्तन केले जातात.

देवीचे श्रीसुक्त, महालक्ष्मी अष्टक, भवान्यष्टकम, ललिता पंचकम, महिशासूर मर्दींनी,अन्नपूर्णा स्तोत्र, सप्तश्लोकी दुर्गा, देव्यपराध क्षमापनस्तोत्र, मातृस्तवने, जोगवा समूहिक म्हटले जातात. कुंकूमार्चन, होम- हवन केले जाते. खास नवरात्रीसाठी मंडळातर्फे देवीचे मातृस्तवन, जोगवा, वेगवेगळ्या आरत्यांचे “भक्तीदीपिका” पुस्तकही काढण्यात आले आहे. कोजागिरी ला आवर्तनाची सांगता केली जाते. मिळालेल्या देणगीतून मंडळातर्फे समाजिक कार्य केली जातात.

मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, मंजुषा राव, रेवती शेंदुर्णिकर, साधना दामले, सुनीता सातपुते,अश्विनी जोशी, रोहिणी कुलकर्णी, अंजली धवसे, सुनीता कुलकर्णी, आसावरी जोशी, सविता नाईक, स्वाती विजय कुलकर्णी, निलिमा नाईक, वैजयंती पाध्ये, स्वाती टेनी, सरोजताई वाडकर, तनुजा पाठक, मेघा नाईक, ज्योती भोकरडोळे, डॉ. वैजयंती पाध्ये, प्रतिमा काटदरे, वैदेही नाखरे, संजीवनी नांदेडकर, वैशाली कुलकर्णी व सुरभीच्या सभासद आवर्तन ग्रुप मध्ये आहेत. दरवर्षी 15 ते 20 ठिकाणी आवर्तन केले जातात. मागील वर्षा पासून सुरभी सभासदां मधून 9 महिलांचा नवरात्रात 9 दिवस “सुरभि – कर्मस्वामिनी ” म्हणून परिचय करून दिला जातो.

Protected Content