विवेक ठाकरे यांची मधुस्नेह संस्था समूहात समन्वयकपदी नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.धनाजी नाना चौधरी यांच्या प्रेरणेतून लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी स्थापन केलेल्या सर्व शैक्षणिक संस्थाचा ‘मधुस्नेह’ म्हणून ओळख असलेल्या समूहात समन्वयक पदावर ज्येष्ठ पत्रकार व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे यांची समूहाचे अध्यक्ष आ.शिरीषदादा चौधरी यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.

मधुस्नेह संस्था समूहात रावेर तालुक्यातील पाल येथील सातपुडा विकास मंडळाचे माध्यमिक विद्यालय,सिनियर कॉलेज,कृषी विद्यालय विविध ठिकाणच्या सहा आश्रम शाळा, कृषी विज्ञान केंद्र,जनता शिक्षण मंडळ संचालित खिरोदा व उदळी येथील माध्यमिक विद्यालय,बालक मंदिर,डी.एड. तसेच बी.एड.कॉलेज,चित्रकला महाविद्यालय व पंचायतराज प्रशिक्षण केंद्र,तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर संचालित डी.एन.कॉलेज,फार्मसी कॉलेज साकेगाव येथील पूर्व खान्देश कृष्ठ सेवा मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय,धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी जळगांव संचालित आर्ट,सायन्स व विज्ञान तसेच समाजकार्य महाविद्यालय आणि मुंबई वांद्रे येथील चेतना शिक्षण संस्थेचे विविध फॅकल्टीज या सर्व
मातृसंस्थांमध्ये कृषि व ग्रामविकासाच्या अनुषंगीक उपक्रमांसाठी समन्वयक म्हणून विवेक ठाकरे कार्यरत राहणार आहेत.

आ.शिरीषदादा चौधरी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संस्था परिवारातील सर्व ज्येष्ठ संचालक तसेच सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मधुस्नेह संस्था समूहाची उज्ज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी भरीव काम करणार असल्याचे विवेक ठाकरे यांनी नियुक्तीनंतर म्हटले आहे.

Protected Content