तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील अमर रगडा दुकानाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून एका तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे, शुक्रवारी २ जून रोजी रात्री ९ वाजता दुचाकी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चंदर दिलीपकुमार सचदेव (वय ३५, रा. सिंधी कॉलनी जळगाव) हा तरुण बॅटरी सर्विसिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. १ जून रोजी रात्री ८ वाजेच्या  सुमारास चंदर सचदेव हा त्याची दुचाकी (एमएच १९ सिटी ४१४) एक्टिवाने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील अमर रगडासमोर आला होता, त्या ठिकाणी त्यांने दुचाकी पार्किंग करून लावली व कामानिमित्त निघून गेला. दरम्यान अज्ञान चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर तरुणाने दुचाकीचा परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु  कुठेही  माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवार २ जून रोजी दुपारी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

Protected Content