सावखेडा सिम येथे ई श्रम कार्ड नाव नोंदणी महाअभियान

यावल प्रतिनिधी । येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या माध्यमातुन सावखेडा सिम येथे मोफत असंघटीत कामगारांसाठी ई श्रम कार्ड नोंदणीसाठी महाअभियान राबविले जात आहे.

या संकटकाळात राज्य आणि केन्द्र शासनाकडून मदत म्हणुन दोन लाख रूपये  दुर्घटना विमा मिळेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या सामाजीक लाभाचे वितरण आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी या ई श्रम कार्डची नोंदणी अतिमहत्वाची राहणार असुन संबंधीत नागरीकांनी या संधी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

यावल येथील डॉ कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने (दि.१९ जानेवारी) रोजी सकाळी १० ते दुपारच्या २ वाजेपर्यंत सावखेडा सिम येथील सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळाच्या ठिकाणी या ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचे आयोजन करण्यात आलेले असुन या नोंदणी महाअभियानाचे शुभारंभ युवा सामाजीक कार्यकर्त तथा तत्कालीन नगरसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सदरच्या नोंदणी अभियानात शेतकरी/ शेतमजुर, पशुपालन करणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, लेदर कामगार, सुतार, विटभट्टीवर काम करणारे, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, फळ विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्शा चालक, आशा कामगार, दुध उत्पादक शेतकरी, स्थलांतरीत कामगार, टेलर, दुकानदार यांनी ई श्रम कार्ड नोंदणीसाठी संबधीत व्याक्तीचे आधार कार्ड, बॅंकेचे पासबुक, मोबाइल क्रमांक, वारसदाराचे नाव, वारसदाराचा जन्म दिनांक ईत्यादी आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणीच्या अभियानास्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन या कार्यक्रमाचे स्थानिक आयोजक सलीम तडवी ९५०३o६९३२१ आणि सागर लोहार ७६२o७२१७९९ , दिनेश पाटील ७७७३९३७७७१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

Protected Content