विरावलीच्या स्मशानभुमीतील हायमस्ट लॅम्पचे लोकार्पण

 

  यावल : प्रतिनिधी । विरावली येथे जि प शिक्षण व आरोग्य तथा क्रीडा सभापती  रवींद्र पाटील  यांचे वाढदिवसाचे औचित्य  साधत स्मशानभूमीत सौरहायमस्ट लॅम्प बसवण्यात आला .

 

याप्रसंगी यावल  राष्ट्रवादी युवक व छत्रपती फाऊंडेशन अध्यक्ष तथा ग्रा पं सदस्य   अ‍ॅड. देवकांत पाटील  , माजी ग्रा पं  सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पवन पाटील ,  पीक  संरक्षण सोसायटी  चेअरमन अर्जुन पाटील,  प्रगशील शेतकरी  मनीष पाटील ,वि का सो संचालक शरद राजपूत ,  पीक सरक्षण सोसायटीचे संचालक गोरख पाटील सामाजिक कार्यकर्ते संजू तडवी , वि का सो संचालक गुलाब पाटील, छत्रपती फाऊंडेशन संचालक प्रल्हाद पाटील ,चेतन पाटील , देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते .

विरावली गावात स्मशानभूमीत रात्री खूप अंधार होत असे  त्याठीकाणी लाईटची व्यवस्था नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते अशा वेळी ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांच्या उजेडाने अंत्यसंस्कार करण्यात येत होते जात . काही दिवसापूर्वी सभापती  रविंद्र पाटील यांच्याकडे अ‍ॅड.  देवकांत पाटील ,ग्रा पं सदस्य  शोभा पाटील , शकुंतला पाटील , हमीदा तडवी  यांनी ही  मागणी केली होती जि प सभापती रवींद्र पाटील यांनी  जि प सदस्य  निधीतुन सौर हायमस्टलॅम्प बसवला  ऍड देवकांत पाटील आणि अर्जुन  पाटील यांनी  नारळ वाढवून हायमास्ट लॅम्पचे  लोकार्पण  केले .

 

Protected Content