भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खान्देश टोलकाट्यासमोरील एका पत्र्याच्या गोडाऊनवर डीवायएसपींच्या पथकाने सोमवारी सकाळी छापा टाकून सुमारे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील खानदेश टोल काट्याच्या बाहेर असलेल्या पत्राच्या शेडमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातील पोलिस अंमलदार नंदकिशोर सोनवणे, अनिल झुंजारराव, स्वप्निल पाटील, श्रीकांत ठाकूर यांनी सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता छापा टाकला. यावेळी गोडावूनमधून ५ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी उमेश भगवान पाटील वय-३० रा. लहान मारुती मंदिर जवळ, तापी नगर, भुसावळ याला ताब्यात घेतले आहे. त्याचीकसून चौकशी केली असता हा माल गोडावून मालक किशोर आगीचा रा. सिंधी कॉलनी, भुसावळ यांचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी उमेश पाटील आणि गोडाऊन मालक किशोर आधीचा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला आहे. पुढील तपास भुसावळ पोलीस कर्मचारी हे करीत आहे.