भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा निषेध करत यास गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात डी.वाय.एस.पी. कार्यालय, जामनेर रोड, भुसावळ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भुसावळ विभागाचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेबांनी चर्चा करून परिस्थितीनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, जिल्हा सरचिटणीस अतुल चव्हाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सरजू तायडे, पदवीधर जिल्हा सरचिटणीस गोपाळ पाटील, युवक भुसावळ शहराध्यक्ष रणजित चावरिया, उपाध्यक्ष राहुल वाघ, संघटक सचिन पाटील, कार्याध्यक्ष विशाल ठोके, तुषार चौधरी, तुषार हडप, प्रदीप कोळी, नितीन वराडे, धर्मराज तायडे, रुपेश बाविस्कर, निलेश जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.