जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील भोकर किनोद रोडवरील कठोरा गावाजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक डंपरमधून होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता कारवाई करत वाळूने भरलेले डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ५१५६) पकडले. चालक मिलींद गोकुळ सपकाळे रा. डांभुर्णी ता. यावल याच्याकडे वाळू वाहतूक करण्याबाबतचे कोणतेही कागदपत्रे काढळून आले नाही. पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर ताब्यात घेतले. याप्रकरणी पोहेकॉ संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरचालक मिलींद सपकाळे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे करीत आहे.