पीपल्स पीस फाऊंडेशनच्या भागवत कथेत हरदासींच्या हस्ते महाआरती !

जळगाव प्रतिनिधी । येथील पीपल्स पीस फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथेत अमळनेर येथील हरदासींच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

पीपल्स पीस फाऊंडेशनतर्फे श्रीमद्भागवत कथा सप्ताह दि. १७ ते २४ जुलै २०१९ या कालावधीत दररोज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत शहरातील लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे सुरू आहे. यामध्ये ज्योतिषाचार्य कृष्णानंदजी महाराज मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान, सोमवारी महाआरतीसाठी अमळनेर शहरातील ३० हरदासी महिला उपस्थित होत्या. पहिल्यांदाच आम्हाला एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात बोलविण्यात आले आहे. हा आमचा एक प्रकारे सन्मानच असून त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्हाला दुसरे काम मिळवून दिल्यास आम्ही हे काम सोडण्यास तयार आहोत. मात्र समाजाने आम्हाला सन्मान द्यायला हवाफफ अशा भावना व्यक्त करत त्यांनी पीपल्स पीस फाऊंडेशनचे आभार मानले. पीपल्स पीस फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनजीतकौर मतानी यांनी त्यांच्याशी संवाद साधुन त्यांना बोलते केले. यावेळी आधार संस्थेच्या लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक अल्केश वाघरे, ओ.आर. डब्ल्यू. म्हणून सईदा शेख, महिला व बाल सहाय्य कक्ष जळगावच्या समुपदेशक शोभा हंडोरे व पीयर म्हणून नंदनी चौधरी तसेच सोनी लोणारे, सुनीता राठोड, नजमा खालीक , नंदनी चौधरी, आशा कांबळे उपस्थित होते

समाजातील सर्व घटकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेता यावी, म्हणून या भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कथेच्या ठिकाणी येऊन श्रवणाचा व महाआरतीचा लाभ मिळावा म्हणून समाजातील अशा घटकांना जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी करुन घेण्याचा आम्ही दररोज प्रयत्न करणार आहोत, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. आज कथा समाप्ती होणार असून दि. २४ जुलै २०१९ रोजी महायज्ञ व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा सर्वांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पीपल्स पीस फाऊंडेशन यांच्या तर्फे करण्यात आले आहे. भागत कथाच्या यशस्वीतेसाठी सुप्रिम इंडस्ट्रीज, प्लॅन्टो कृषीतंत्र, अमर दूध, नवरंग चहा, सोयो सिस्टीम्स, एस.के. ट्रान्सलाईन, रॉयल फर्निचर, व्ही.पी. भंडारी, प्रचिती मीडिया यांचे सहकार्य लाभत आहे.

Protected Content