अंतुर्लीत कार्तिक स्वामींचा यात्रौत्सव

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा दोन यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कृतिका नक्षत्राच्यानिमित्त हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी वर्षातून फक्त दोन दिवस खुले करण्यात येत असते. यानुसार सोमवार दि. ७ व मंगळवार दि. ८ या दोन दिवशी कार्तिक स्वामींचे मंदिर खुले राहणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेला हजेरी लावतात व दर्शन घेत असतात. गावाशेजारीच बोरी नदी असून त्याच काठावर यात्रा भरवली जाते. सद्यस्थितीत अंतुर्ली येथील बोरी नदीवरील साठवण बंधारा विलोभनीय असा ओसंडून वाहत असल्याने यात्रेकाळात येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातील तीन मंदिरांपैकी अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. येथील यात्रेचा अख्ख्या खान्देशात नाव लौकिक असून,कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोर पीस या यात्रेतील खास आकर्षण असते. दरम्यान दोन दिवस चालणारा कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव काळात लाखोच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावावी असे आवाहन कार्तिक स्वामी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content