Home क्राईम रानडुक्करच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रानडुक्करच्या हल्ल्यात शेतकरी जखमी


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।धरणगाव ते मानखेडा रस्त्यावरील शेतात रान डुक्करने अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. जखमी झालेल्या शेतकऱ्याला धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव ते मानखेडा रस्त्यावरील शिवारातील शेत नंबर ११०४ या शेतात शेतकरी अशोक यशवंत पाटील रा. धरणगाव हे नेहमीप्रमाणे बुधवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी शेतात कामासाठी गेले. त्यावेळी शेतात काम करत असतांना सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर रान डुक्कराने हल्लो केला. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला, हाताला आणि पायाला चावा घेतला. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, धरणगाव शिवारातील शेतात रान डुकरांना वावर अधिक वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound