तिप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवत चालकाची २ लाखात फसवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तिप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवत चालकाची २ लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नथ्थू काशीनाथ कोळी (वय-४६) रा. बाळापूर फागणे ता.जि. धुळे यांच्यासह वास्तव्याला आहेत. ते चालक असल्याने खासगी वाहनाने जळगाव जिल्ह्यात देखील येणे जाणे राहते. दरम्यान, १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते जळगावात आले. त्यावेळी त्यांची भैय्या महाजन (पुर्ण नाव माहित नाही), एक अनोळखी व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक धारक ९१७५०८७३२९ यांची ओळख निर्माण झाली. तिघांनी नथ्थू कोळी यांचा विश्वास संपादन करून घेतला. त्यांनी तुमचे पैसे तिप्पट करून देतो असे आमिष दाखविले. त्यानुसार नथ्थू कोळी यांनी जवळ असलेले दोन लाख रूपये दिले. त्यानंतर तिघांनी सहा लाख रूपये भरलेले बनावट नोटांची बॅग नथ्थू कोळी यांना देवून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नथ्थू कोळी यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात य्या महाजन (पुर्ण नाव माहित नाही), एक अनोळखी व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक धारक ९१७५०८७३२९  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content