जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात हळदीच्या कार्यक्रमात लहान मुलांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका चालकाला दोन जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार ११ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ मार्च रोजी पहाटे ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात मंगळवार ११ मार्च रोजी रात्री १० वाजता लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी गावात राहणारा अनिल गिरजू गवळी वय ४० हा घरी जात असतांना हळदीच्या कार्यक्रमात लहान मुलांचे भाडण सुरू होते. त्यावेळी अनिल गवळी हे भांडण सोडविण्यासाठी गेले याचा राग आल्याने सुशिल गुणवंत साठे आणि गुणवंत साठे दोन्ही रा. मोहाडी यांनी अनिल याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी रॉड डोक्यावर टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर अनिल गवळी यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुशिल गुणवंत साठे आणि गुणवंत साठे या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील हे करीत आहे.