वेल्हाळ्यात शेतकर्‍याचा जाहीर आत्महत्येचा ड्रामा ( व्हिडीओ )

velhala drama

भुसावळ संतोष शेलोडे । तालुक्यातील वेल्हाळे येथे अखंड वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी एका शेतकर्‍याने जाहीर फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अधिकार्‍यांनी आश्‍वासन देऊन समजूत काढून संबंधीत शेतकर्‍याला झाडावरून खाली उतरवल्याचे पुढील अनर्थ टळला.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वेल्हाळे आणि परिसरातील शेतकरी खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. यामुळे ते शेतीमध्ये वेळेवर पाणी देऊ शकत नाही. यामुळे त्यांचे नुकसान होण्याची भिती आहे. तर दुसरीकडे वन्य प्राण्यांनीदेखील परिसरात धुमाकुळ घातला असून यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमिवर काही शेतकर्‍यांनी आधीच वीज वितरण विभागाला अर्ज देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तथापि, याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास योगेश आत्माराम पाटील या शेतकर्‍याने झाडावर चढून गळफास घेण्याची तयारी केल्याने गावात खळबळ उडाली.

गावकर्‍यांनी योगेश पाटील यांना झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र त्यांनी याला नकार दिला. थोड्याच वेळात पोलीसांसह वीज वितरण आणि महसूल खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी विनंती करूनही योगेश पाटील खाली उतरण्यास तयार नव्हते. शेवटी वीज वितरणतर्फे अखंड वीज पुरवठ्याचे आश्‍वासन देऊन वन खात्याला वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्यानंतर तो तब्बल पाच तासांनी खाली उतरला. दरम्यान, या पाच तासांमध्ये वेल्हाळे गावात हा ड्रामा चांगलाच रंगला.

पहा : पाच तास चाललेल्या या नाट्याचा व्हिडीओ.

Protected Content