९०० अब्ज रुपयाची गुंतवणूक देणार २ कोटी रोजगार: प्रा.चौधरी

pra. chaidhari

भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाने आयोजित “आशिया खंडातील टेलिकॉम क्षेत्रातील गुंतवणूक व रोजगाराच्या संधी” या विषयावरील कार्यशाळेत इन्स्टिट्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनिर्सच्या सदस्या प्रा. स्मिता चौधरी म्हणाल्या की, पाच वर्षांमध्ये ५ जी एशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ ९०० अब्ज रुपये योगदान देईल, ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्स अलायन्स (जीएसएमए) ने या क्षेत्रातील पुढील पाच वर्षात होणारा प्रगतीचा अहवाल सादर केल्यामुळे भारतीय बाजारपेठेत २ कोटी रोजगार इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम क्षेत्रात निर्माण होतील.

त्याचबरोबर, जियो, व्होडाफोन, आयडिया, एअरटेल, विप्रो, टीसीएस, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांची विस्तार योजना पाहता संधी जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील अभ्यासक्रमात तांत्रिक दृष्टीने बदल करावा तसेच विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित शिक्षण देण्यावर जोर द्यावा अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. टेलिकॉम अभियांत्रिकी क्षेत्राकडे तरुणांचा कल असून, या क्षेत्रातील ऑपरेटर आता प्रगत ५ जी नेटवर्क तयार करण्यात कोट्यावधी डॉलर्स गुंतवत आहेत. जे ग्राहकांना नवीन सेवा प्रदान, उद्योग आणि उत्पादन सुधारत आणि आर्थिक वाढ चालवत आहेत. टेलिकॉम अभियांत्रिकी क्षेत्राकडे तरुणांचा कल वाढू लागला आहे. प्रतिष्ठेची नोकरी आणि उत्तम मानधन म्हणून या क्षेत्राची दखल घेतली जाते अशी माहिती प्रा. स्मिता चौधरी यांनी दिली.
स्मार्ट शहर ते स्मार्ट गाव असा प्रवास दिसणा-या जगभरातील मोबाइल ऑपरेटर, हँडसेट आणि डिव्हाइस निर्माते, सॉफ्टवेअर कंपन्या, उपकरणे पुरवठादार आणि इंटरनेट कंपन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन व सेवा, शहरी व ग्रामीण क्षेत्रात कमालीचा बदल होणार असून, ५ जी जाळ्याच्या सर्वागिण वापराने औद्योगिक उत्पादन, इंटरनेटने जोडलेल्या कार, आरोग्यसेवा, स्मार्ट शहरांचे व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या विकासाला मदत होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील गेल्या दोन तपांच्या कालखंडातील सगळ्यात आश्वासक म्हणता येईल, असा काळ सध्या आहे. येत्या पाच वर्षात स्मार्ट शहरासोबत स्मार्ट गाव असा प्रवास सुरू होईल, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी दिली. कार्यशाळेत डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, डॉ.एम.वाय.तिवारी, प्रा. सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दिपक खडसे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.किशोर चौधरी, प्रा.सुजय राजपूत, प्रा.सचिन हरीमकर, प्रा.वर्षा वाघ, प्रा.लीना अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

Protected Content