Home Cities भुसावळ भुसावळात तरूणाची मोटारसायकलची चोरी; बाजारपेठ पोलीसात गुन्हा

भुसावळात तरूणाची मोटारसायकलची चोरी; बाजारपेठ पोलीसात गुन्हा

0
29
two wheelar thift


भुसावळ प्रतिनिधी ।  शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीतून तरूणाची राहत्या घरासमोरून २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकलची चोरी केल्याचे उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, निलेश कन्हैयालाल अहुजा (वय-३५) रा. सिंधी कॉलनी हे खासगी काम करतात. कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ बीके १०४५) क्रमांकाची होन्डा शाईन मोटारसायकल आहे. २० जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी दुचाकी त्यांच्या घरासमोर लावली होती. २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी त्यांची मोटारसायकल दारासमोर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून मोटारसायकल मिळून आली नाही. याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयराम खोडपे करीत आहे. 


Protected Content

Play sound