Home Cities जळगाव वायसीबी योगाचार्य परिक्षेत डॉ. प्रशांत सोनवणे उत्तीर्ण

वायसीबी योगाचार्य परिक्षेत डॉ. प्रशांत सोनवणे उत्तीर्ण

0
37

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रशांत सोनवणे हे योग प्रमाणीकरण मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकारद्वारे घेतली जाणारी योगाचार्य ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 

योगाचार्य ही परीक्षा देशात प्रथमताच घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून १६ विद्यार्थी बसले होते. महाराष्ट्रातून ते एकटेच ही परीक्षा पास झाले आहेत. सध्या डॉ. प्रशांत सोनवणे हे योग प्रमाणीकरण मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या लेवल-१: योग प्रोटोकॉल इंन्स्टक्टर, लेवल-२ : योग वेलनेस इंन्स्टक्टर, लेवल-३ : योग शिक्षक आणि मुल्यांकनकर्ता, लेवल-४: योगाचार्य या विविध परीक्षांचे ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचा संपर्क क्र. ७७९८५१८८७८ हा आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 


Protected Content

Play sound