भोलाने येथे चार गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; तालुका पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोलाने येथील तापी नदीच्या किनारी बेकायदेशीर हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त केली याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भोलाने येथील तापी नदीच्या काठच्या जंगलात बेकायदेशीर गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ बापू पाटील, दिपक कोळी, सुशील पाटील, सुधाकर शिंदे यांनी आज सकाळी ५ ते ८ वाजेच्या दरम्यान चार ठिकाणी सुरू असलेली गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यात ६२ लोखंडी व प्लास्टीक ट्रम, २०० लिटरचे ६ हजार २०० रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन असा एकुण ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content