सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. निकालात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
दहावीच्या परीक्षेत आर्या पाटीलने ९५.८% गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले, तर गार्गी राणे ९५.६% गुणांसह द्वितीय आणि किरण अत्तरदे ९२.४% गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिली. याशिवाय, तन्वी चौधरी (९२%), तुलसी नारखेडे (९१.६%) आणि लेखा पाटील (९१.२%) यांनीही उत्तम गुण मिळवले.
बारावीच्या परीक्षेत चिन्मय नितीन महाजन याने ९४.६% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. सत्यम गौरब कुमार ८६.६% गुणांसह द्वितीय आणि निहांशू सुनिल पाटील ७५.८% गुणांसह तृतीय स्थानावर आले. विद्यार्थ्यांच्या या शानदार यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मुख्याध्यापिका व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.