गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचे सीबीएसई दहावीतही शतप्रतिशत यश; गुणवंतांची भरारी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलने यावर्षीही इयत्ता दहावीच्या परीक्षेत आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेने शंभर टक्के निकाल नोंदवत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आलेख उंचावला आहे.

दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. तनवी नरहर चौधरी हिने सर्वाधिक ९८% गुण मिळवले, तर ओम हेमंत चौधरी ९७.२% गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. उजमा अखिल पटेलने ९६% गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक पटकावला. याशिवाय रिद्धी पंकज जावळे आणि जिग्नेश प्रदीप महाजन या दोघांनीही ९४.२% गुण मिळवले. कौस्तुभ नितीनकुमार मुदीराज आणि निराली भारतन पाटील यांनी ९३.२% गुण प्राप्त केले, तर अशना युसुफ पटेल ९३% आणि श्वेता अनिल परदेशी ९०.४% गुणांसह यशस्वी ठरले. युवराजसिंग नरेंद्रसिंग ढिल्लोन, शौर्य गोकुळ धावसे आणि प्रांजल अविनाश पाटील व मनस्वी मुरलीधर नंदनवार या सर्वांनी ९०% गुण मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली.

बारावीच्या परीक्षेतही शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. अमेय ललित चौधरी याने ९५% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर अनम अखिल पटेल ९३.४% गुणांसह द्वितीय आणि श्रेया नितीन पाटील ९०.४% गुणांसह तृतीय स्थानावर राहिली.

या नेत्रदीपक यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील आणि शाळेच्या प्राचार्य नीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची अथक मेहनत, पालकांचा भक्कम पाठिंबा आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांमुळेच हे यश शक्य झाले, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापन समितीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.