जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील एकूण ३ विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे नामांकीत कंपनीत निवड झाली.
मुलाखत घेण्यासाठी भागेश्रीचे मॅनेजर डॉ. विवेक फिर्के व विजय फर्के हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुलाखती दरम्यान त्यांनी फिल्ड टेक्निकल ऑफिसर या पदाबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेष तायडे यांनी केले. सूत्रसंचालन ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. मोनिका नाफडे-भावसार यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेष तायडे यांनी हेमंत खडसे, अनिल गवळी, धीरज निकजे विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.