डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी ; भाजपचे निवेदन

6e6854ed 6f5a 4479 8a5d 1b3f9949390f

 

यावल (प्रतिनिधी) मुंबई येथील नायर हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदीवासी समाजातील डॉ.पायल सलीम तडवी हिने सिनिअर डॉक्टरकडून होणाऱ्या रॅगींगला कंटाळून आत्मह्त्या केली असून या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन यावलचे निवासी नायब तहसीलदार आर. के.पवार यांना आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार हरीभाऊ जावळे यांनी दिले.

यावल तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदना म्हटले आहे की, डॉ.पायल सलीम तडवी हिला अनुसुचित जमाती( एस टी ) प्रवर्गातुन दिनांक १ मे २०१९ ला नायर हॉस्पीटल अर्थात टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे वैद्यकीय पदव्युतर स्त्रीरोग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला होता. डॉ.पायलचे एमडी अभ्यास क्रमाचे दुसरे वर्ष सुरू होते. ह्याच हॉस्पीटलमध्ये डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकीता खंडेलवाल या तिघं सिनिअर डॉक्टर म्हणुन कार्यरत होत्या. या तिघांनी डॉ.पायल तडवीला जातीच्या नावावर छळ करत जातीय द्वेषातुन अर्वाच्च शिवीगाळ व जातीचे टोमणे मारत होते. डॉ.पायल हिला रूग्णांसमोर अपमानीत करीत होत्या. तिचा सोशल मिडीयाच्या हॉटसअॅप ग्रुपवरून हिन लेखणारे मॅसेज पाठवित होते. या सर्व रॅगींगच्या माध्यमातून जातीय द्वेषातून होणाऱ्या मानसिक छळाविषयी डॉ.पायल तडवीची आई आबेदा तडवी यांनी नायर हॉस्पीटलचे प्रशासन डीन, डीएचओ, आणि अग्रीपाडा- भायखळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे या सर्व गंभीर प्रकरणाची निवेदनाद्वारे माहीती दिली होती.

या लेखी तक्रारीकडे या सर्व प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे त्रास असह्य झालेल्या डॉ.पायल सलीम तडवी हिने २२ मे रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नायर हॉस्पीटलच्या वसतीगृहातील खोली क्रमांक८०६ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या सर्व प्रकरणाला जबाबदार असलेल्या तिघं डॉक्टरांची वैद्यकीय पदवी रद्द करण्यात यावी. शिवाय दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून डॉ.पायल तडवीच्या कुंटुबाला न्याय मिळवून द्यावा. तसेच शासनाच्या वतीने तज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात येऊन अतीजलद न्यायलयात या प्रकरणाला चालविण्यात यावे, अशी मागणी आमदार आणि राज्यस्तरीय रॅगींग विरोधी समितीचे सदस्य हरीभाऊ जावळे यांनी आपल्या निवेदनाव्दारे केली आहे.

यानिवेदनावर आमदार हरीभाऊ जावळे, पं.स सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, अनुसुचित जमातीच्या कार्यकारणी सदस्य मिना राजू तडवी, विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, हर्षल गोविंदा पाटील, पं.स. सदस्य दिपक पाटील, जि.प. सदस्य सविता अतुल भालेराव, यावल कृबी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राकेश वसंत फेगडे,लुकमान रूबाब तडवी, देवीदास धांगो पाटील, यावलचे माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे, योगेश विजय चौधरी, सादीक शेख मजीद, लहु रामभाऊ पाटील, हेमराज फेगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Add Comment

Protected Content