यावल येथील ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबीर

यावल प्रतिनिधी । रायगड येथील सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास यावल शहरासह परीसरातील नागरीकांनी प्रतिसाद दिला.

यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत दिनांक 3 /3 /2020 रोजी पार पडलेल्या या रक्तदान शिबिरासाठी जळगाव जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाचे संपर्ण पथक येथील शिबिरास आलेली होती त्यात डॉ. उमेश कोल्हे जळगाव, मनीषा पाटील, सचिन बकाल, भरत महाले, प्रकाश चौधरी, राहुल कोळी, सुभाष सोनवणे, तेजस नेमाडे, शुभम राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, वैद्यकिय अधिकारी अधिकारी डॉ .पी .एल .पवार यांच्यासह ग्रामीण रूग्णालयाच्या सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले . या रक्तदान शिबिरास नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात दुपारी दीड वाजेपर्यंत एकुण ७३ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले होते. यावेळी रक्तदानात सहभाग घेवुन आपले रक्तदान करणाऱ्यांचे महाराष्ट्र भुषण डॉ . नानासाहेब धर्माधिकारी या समाज सेवी संस्थेच्या वतीने आभार मानले. या रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ . विनेश पावरा , एस .एस . घोडके , सुर्यकांत पाटील व त्यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Protected Content