बुलढाणा येथे आठवीची विद्यार्थींनी झाली एक दिवसासाठी जिल्हाधिकारी

बुलढाणा (अमोल सराफ) । जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च निमित्त महिला सशक्तिकरण अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी हाती घेतला आहे. २ मार्चला पाडळी येथील जि.प.शाळेच्या आठवीतील विद्यार्थीनी पुनम देशमुख एक दिवसाचा जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला गेला.

हा सांकेतिक प्रभार पुनम देशमुखला सोपवून सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसविले. तेव्हा तिच्यासमोर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा व प्रशासकीय अधिकारी बसले होते. यावी पूनमने स्त्री शिक्षणासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रशासन लोकाभिमुख व्हावे. प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी. यासाठी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा नवनवे प्रयोग राबवित असतात. त्यांनी महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत 2 ते 8 मार्च दरम्यान महिला सप्ताह राबविण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनविण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पाडळी गावातील पुनम देशमुख जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळविला. तिला येथे आठवीत सर्वाधिक 98 टक्के गुण मिळाले आहेत. यावी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जेव्हा पूनम देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता.

माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मला जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्या संकल्पनेतून थेट जिल्हाधिकारी सांकेतिक रूपात मी आज दिवसभरात प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेतला, असे मत एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनवलेला पुनम देशमुख याचे होते. यावी तिला छत्रपती संभाजी महाराज जयंती विषयी आ.संजय गायकवाड यांनी निवेदन दिले. एकंदरीत या अभिनव उपक्रमाची संपूर्ण जिल्हाभर कौतुक केले जात आहे.

Protected Content