डॉ. केतकी पाटील यांनी मुक्कामी राहून राबविले लालमाती येथे गाव चलो अभियान

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी चे गाव चलो अभियान 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे. यात पदाधिकाऱ्याना ग्रामीण भागात एक दिवस वास्तव्य करून पक्षाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची होती. भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील लालमाती येथे 10 रोजी मुक्काम करून सदर अभियान राबविले.
या अभियानांतर्गत डॉ.केतकी पाटील यांनी येथील आश्रम शाळेस भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. विद्यार्थिनी सोबत आदिवासी नृत्यात सहभाग घेतला.

यानंतर गावातील युवकांशी संवाद साधून शासकीय योजनांनबद्दल माहिती दिली. बूथ प्रमुख,बूथ समिती व पन्ना प्रमुख, नव मतदार यांच्याशी चर्चा केली.येथील रामदेव बाबा मंदिरात महिलांसोबत स्वयंपाकात सहभागी झाले . बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून त्यांना सरकारच्या महिलांसाठी असलेल्या स्कीम ची माहिती दिली.उपस्थित महिलांसोबत त्यांचे पारंपारिक होळी नृत्यात सहभाग घेतला.
गावातील खेळाडू,भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याही भेटी घेतल्या.बूथ क्रं 19 चे प्रमुख व बूथ समितीच्या सदस्यासोबत दीवार लेखन केले. गावात गाव चलो अभियानाची पत्रके वितरीत केली. यावेळी सरकारी योजनांच्या लाभार्थी सोबत चर्चाही केली.

बालक,युवा,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी सकारात्मक चर्चा झाल्या. यावेळी रावेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष चेतन दादा पाटील, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका सारिका ताई चव्हाण,लालमातीचे गाव नियोजक दिनेश पवार, बूथ प्रमुख अनिल पवार, पन्ना प्रमुख राधेश्याम पवार, शाखाप्रमुख प्रकाश मांगो चव्हाण, युवा मोर्चाचे हर्षल सुरेश चव्हाण ,व्हाट्सअप प्रमुख कृष्णा प्रेमसिंग पवार, गणेश पवार,बुथ सदस्य जगराम अशोक पवार, नांदुरा मांगो मोती पवार ,नवलसिंग धर्मा पवार,फत्तु जालम पवार, श्रावण हजारी पवार, अनिल हरदास पवार, जयवंत तोताराम पवार, गिरधारी नारायण पवार, अशोक गल्लू पवार, राधेश्याम नवलसिंग पवार,प्रेमचंद लक्ष्मण पवार, लक्ष्मण नारायण पवार,दरबार गिरधारी पवार, दिलीप मानसिंग चव्हाण, गोविंदा रोहिदास पवार, दिनेश पवार, पांडुरंग दगडू चव्हाण, हर्षल सुरेश चव्हाण, सचिन रमेश पवार, जगदीश नवलसिंग पवार, भीमसिंह पद्मसिंह पवार, मुकेश बद्री चव्हाण,भागीरथ दशरथ पवार, निलेश संजय पवार, लखन प्रेमचंद पवार,कृष्णा किरण चव्हाण, रवींद्र बाबू पवार, तर महिलांमध्ये रेषीबाई बंददू जाधव, पार्वतीबाई मानसिंग चव्हाण, अबेबाई दगडू चव्हाण, लिलाबाई फत्तु पवार, ताई बाई नवलसिंग पवार, देवकाबाई मांगो चव्हाण, कोकीळाबाई मुरलीधर सावळे, कस्तुराबाई दशरथ पवार,केसरी बाई मांगो पवार, नीतूबाई दशरथ पवार, वंदनाबाई पंडित राठोड, मैनाबाई अशोक पवार,गोदाबाई लक्ष्मण पवार, बन्नीबाई जयवंत पवार,रूपालीताई योगेश धनगर, सरला प्रकाश चव्हाण, पूजाबाई राधेश्याम पवार,कलाबाई काळू राठोड, केसरी बाई नरसिंग पवार आदींची उपस्थिती होती.

Protected Content