विरावली ग्रामस्थांनी खासदार रक्षाताई खडसे यांना दिले विकासासाठीचे निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जनसंपर्क अभियाना निमित्त खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेर तालुक्यातील विरावली या गावात भेट दिली. याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य व काही गावकऱ्यांच्या वतीने त्यांना गाव पातळीवरील विविध अडचणी, समस्या व उपाय योजना संदर्भात मागणीचे निवेदन देण्यात आले.

विरावली विकास सोसायटीच्या वतीने खासदार रक्षाताई खडसे यांचे संस्थेचे चेअरमन अर्जुन पाटील व व्हाईट चेअरमन नरेंद्र सोनवणे व संचालक मंडळाने स्वागत केले. या कार्यक्रमात सर्व संचालक मंडळसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम पंचायत सदस्य व काही गावकऱ्यांच्या वतीने गाव पातळीवरील विविध अडचणी समस्या व उपाय योजना संदर्भात मागणीचे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांना दिले.

त्यात नापिकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांना कर्ज माफी योजनेचे अनेक लाभार्ती वंचित राहिल्याचे तसेच नियमित कर्जदार प्रोत्साहन लवकर मिळावे. हवामानाचे पीक नुकसानाची विमाच्या लाभ काही शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याबाबत तसेच ग्राम पंचायत सदस्य यांनी विरावली गावातील वार्ड क्र ३ मध्ये बस स्थानक ते हनुमान मंदिर ते सुरेश बंडू पाटील यांचे शेत हा रस्ता विरावली गावातील मुख्य रस्ता असून या रस्त्याने चालतांना पावसाळ्यात लहान मूल व ज्येष्ठ ग्रामस्थांचे  सर्वांचे प्रचंड हाल होत असतात तरी आपण खासदार निधीच्या माध्यमातून आमच्या विरावली गावात कॉंक्रिटीकरण करून विरवली गावातील मुख्य रस्ता तयार करून द्यावा.” अशी वार्ड क्र 3 च्या नागरिकांची मागणी केली.

दुसरे एक निवेदन देत “काही दिवसापासून आपल्या राज्यात लम्पी या त्वचा रोगाशी संबंधित गाई व बैल या आपल्या जनावरांना संसर्गजन्य रोगाने ग्रासले असून ज्या पशुपालकांचे जनावरे लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडली असतील त्यांना नुकसान भरपाई मिळावी.” याकरता यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेस व गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे मागण्या समस्या लवकरात लवकर सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषदच्या सदस्या सविता भालेराव, भाजपाचे तालुका सरचिटणिस विलास पाटील, उज्जनसिंग पाटील, अतुल भालेराव यांची उपस्थिती होती.     

विरावली गावातून ग्रामपंचायत सदस्य ॲड.देवकांत पाटील भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील, संचालक गुलाब पाटील, संचालक बाजीराव पाटील, संचालक संजय मोतीराम पाटील, युवराज पाटील, पवन पाटील, गिरीश पाटील, योगेश पाटील, तेजपाल पाटील, सुभाष पाटील, बादशाह पाटील, विजयसिंह पाटील, हिरालाल पाटील, यशवंत पाटील, अजबराव पाटील, सुरेश पाटील, नानाजी पाटील, फकीरा पाटील, राजेश निळे, आदींची उपस्थिती होती.

Protected Content