पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे काँग्रेसला भविष्य नाही – विश्वास पाठक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासात्मक घोडदौड सुरू आहे, ते पाहता काँग्रेसला भारतात कुठेही भविष्य दिसत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना मोदीविरोधी वक्तव्ये करावी लागत आहेत, असा टोला भाजपचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शनिवार, दि. १० फेब्रुवारी रोजी लगावला.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. युपीए आणि एनडीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेचे तसेच वीज, पाणी, गॅस, शैक्षणिक सुविधा आदी क्षेत्रांतील कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी मांडत, विश्वास पाठक यांनी युपीए
सरकारच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “युपीएच्या काळात भारताचा सरासरी महागाईचा दर तब्बल ८.२ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे सामान्य जनतेला सतत दहा वर्षे महागाईची झळ सोसावी लागली. परंतु, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत बदल करून, महागाईचा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश मिळवले आहे. कोरोनासारखे संकट येऊनही, भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. अंत्योदयाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आखलेल्या योजनांमुळे २५ कोटी जनता दारिद्रयरेषेच्या वर आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

युपीए सरकारच्या काळात मंत्र्यांच्या निकटवर्तीयांना कर्जे देण्यासाठी हस्तक्षेप होत असल्याने, बँकांच्या बुडीत कर्जामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ होऊन, पूर्ण बँकिंग यंत्रणा डबघाईला आली होती. मोदी सरकारच्या बँकिंग धोरणामुळे अनेक बँका कार्यक्षम होऊन, देशाला विकसित भारत बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. २०१४ पर्यंत ग्रामीण भागात केवळ तीन कोटी घरांमध्ये स्वच्छ पाण्याचे नळ होते. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात ‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत तो आकडा तबब्ल १३.८ कोटींच्याही पुढे गेला आहे. ‘डीबीटी’च्या माध्यमातून युपीए सरकारच्या काळात केवळ दहा कोटी लाभार्थी होते, तिथे आज मोदी सरकारच्या काळात वेगवेगळ्या ३१० योजनांचे तब्बल १६६ कोटी लाभार्थी आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत २५ कोटींहून अधिक लोक गरिबीतून मुक्त झाले आहेत,” असेही विश्वास पाठक म्हणा

Protected Content