जागतिक युवा पार्लमेंट संमेलनात खासदार रक्षाताई खडसे यांनी मांडले विचार

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शर्म–अल-शेख (इजिप्त) येथील ८ व्या “आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलन” च्या पहिल्या दिवशी खासदार रक्षाताई खडसे यांनी “ग्रीन बजेट मेकिंग इंटरव्हेंशन” या सत्राच्या अध्यक्षस्थानी राहून भारतातर्फे आपले विचार मांडले.

शर्म–अल-शेख (इजिप्त) येथे आयोजित दोन दिवशीय ८ व्या “आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलन” मध्ये पहिल्या दिवशी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “ग्रीन बजेट मेकिंग इंटरव्हेंशन” या सत्राच्या अध्यक्षस्थानी राहून संमेलनात भारतातर्फे आपले विचार मांडले.

सदर संमेलनाचे “जागतिक पर्यावरण हवामान बदल (Climate Change)” वर जगातील तरुणांचे याबाबतीत काय विचार आहे व काय उपाय केल्याने पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल किंवा ते कसे आटोक्यात ठेवण्यात येईल ह्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी सदर संमेलन ”इंटर-पार्लमेंटरी युनियन (IPU) व इजिप्त्शियन पार्लामेंट” यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ व १६ जून २०२२ या २ दिवसाकरीता आयोजित केलेले असुन, संमेलनाच्या पहिल्या दिवशी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “ग्रीन बजेट मेकिंग इंटरव्हेंशन” या सत्राचे अध्यक्षस्थान भूषवून भारतातर्फे देशाचे व आपले विचार मांडून विविध उपाय सुचविले.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे या अध्यक्षस्थानी तर, फिनलँड येथील खासदार सबेस्टीयन त्य्नक्क्येनेन, झिम्बाब्वे येथील खासदार व्हिन्सेंट स्वंगीराई, जोर्डन येथील खासदार ईस्लाम अल्ट बशात ई. मंचावर उपस्थित होते.

 

Protected Content