डॉ. जगदीश पाटील यांनी घेतले कलशाचे दर्शन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीराम मंदिरासाठी काढण्यात आलेल्या अक्षता कलश यात्रेचे कॉंग्रेस नेते डॉ. जगदीश पाटील यांनी दर्शन घेतले.

अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिरात भगवान प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. यानिमित्ताने मुक्ताईनगर ६ जानेवारी रोजी रामभक्तांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थिनी व कलश धारी महिला, विद्यार्थी व सर्व हिंदू बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते.

त्यावेळी सजवलेल्या रथावर भगवान प्रभू रामाच्या व महावीर हनुमानाच्या प्रतिकृती मूर्ती व अक्षदा कलष सुशोभित फुलांनी सजवलेले होते. ह्या सजावटीत निघालेल्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मुक्ताईनगर येथील कॉंग्रेसचे कमिटीचे प्रदेश सदस्य डॉक्टर जगदीश पाटील हे सहभागी झाले. त्यानी अक्षता कलष चे पूजन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभू रामचंद्र व भगवान हनुमंत राया यांनी भारतावर सुख शांती, समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना केली.

Protected Content