बसस्थानक आवारातून तरूण शेतकऱ्यांची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेतून एका तरुण शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडला असून याबाबत शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, ज्ञानेश्वर रवींद्र पाटील वय-३१ रा.मितावली ता.चोपडा जि.जळगाव हा तरुण शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता त्याची दुचाकी (एमएच १९ डीटी ३३२०) घेवून जळगाव शहरात आलेला होता. शहरातील जुने बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागेत त्यांनी त्याची दुचाकी पार्क करून कामानिमित्त शहरात निघून गेला होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली, दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे करीत आहे.

Protected Content