सुमित पाटील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

जळगाव : प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व गौरी गृपचे चेअरमन सुमित पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

रविवारी रेडक्रॉस सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जळके येथील माजी सरपंच रमेश पाटील, काबरा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा, रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, राजनंदिनी संस्थेच्या अध्यक्षा सौ.संदिपा वाघ उपस्थित होते.

सुमित पाटील हे खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी आजवर पाचहजार पेक्षा जास्त विवाह जुळवले आहेत. ते सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात असे एस.डी.वाघ यांनी सांगितले. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून यापुढे देखील सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचे पुरस्कार स्वीकारताना सुमित पाटील यांनी सांगितले.

Protected Content