जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ.एस. एम. पाटील (परिसर संचालक) डॉ. अशोक चौधरी (संशोधन संचालक)कार्यक्रमांचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शैलेश तायडे प्रमुख मार्गदर्शक प्रा. कृष्णा पाटील, औरंगाबाद येथील करिअर बाबा अकॅडमी उप प्राचार्य प्रा. प्रवीण देवरे, डॉ. मोनिका भावसार व राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.आर. दहिवले परीक्षा विभाग प्रमुख प्रा. शरद पाटील व इतर प्राध्यापक व सर्व विद्यार्थी व विद्यर्थिनी उपस्थित होते.
यावेळी डॉ.एस.एम.पाटील यांनी युवक कसा असावा व मातृत्व कसे असावे हे सांगितले. डॉ. अशोक चौधरी यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे विचार सांगितले तर प्रा.कृष्णा पाटील यांनी महापुरुषांविषयी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्ष डॉ.शैलेश तायडे यांनी अडचणीवर मात करून ध्येय साध्य केले पाहिजे ते सांगितले. विद्यार्थ्यांनीही भाषणे दिली. प्रास्ताविक प्रा. गोणशेटवाड बी. एम. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किमया नांदरे व रोहन ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन शुभम दुबे यांनी मानले.